Ad will apear here
Next
खासदार पाटील यांनी घेतली रेल्वे अधिकाऱ्यांची भेट
खासदार पाटील - रेल्वे अधिकारी भेटजळगाव : जळगावचे खासदार ए. टी. (नाना) पाटील यांनी १२ जुलै रोजी पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक श्री. गुप्ता, तसेच पश्चिम मंडल व्यवस्थापक मुकुल जैन यांची अंमळनेर येथे भेट घेतली. पश्चिम रेल्वेच्या जळगाव ते गुजरातमधील उधना स्थानकादरम्यान लोहमार्गांचे परीक्षण सुरू आहे. या वेळी खासदार पाटील यांनी त्यांची भेट घेऊन अंमळनेर व धरणगाव स्थानकांबद्दलच्या समस्या मांडल्या.

तालुका अध्यक्ष हरचंद लांडगे, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. व्ही. आर. पाटील, रेल्वे स्टेशन कमिटी सदस्य बजरंग अग्रवाल, श्री. बग्गा, शरद सोनवणे, लालू सैनानी, श्री. जुलाल या भेटीदरम्यान खासदार पाटील यांच्यासोबत होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZLQBE
Similar Posts
अंमळनेर स्थानकात बांद्रा पाटणा गाडीला थांबा देण्याची मागणी अंमळनेर (जळगाव) : नव्यानेच सुरू झालेल्या ‘बांद्रा पाटणा हमसफर’ गाडीला अंमळनेर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला होता. मात्र गाडीला थांबा देऊनही अचानक थांबा रद्द करण्यात आला. हे लक्षात आल्याने खासदार ए. टी. पाटील यांनी कार्यकर्त्यांसह अंमळनेर रेल्वे स्थानकावर ठाण मांडले. जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार ए
‘जळगाव, सांगलीमधील यश हा विकासाचा विजय’ मुंबई : ‘जळगाव व सांगली–मिरज-कुपवाड महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेले जबरदस्त यश म्हणजे जनतेने विकासाला दिलेला कौल आहे. या विजयाबद्दल मी मतदारांचे आभार मानतो आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो,’ अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील-दानवे यांनी शुक्रवारी (तीन ऑगस्ट) व्यक्त केली
विस्तारक व पालक आढावा बैठक जळगाव : पारोळा तालुका विस्तारक व पालक आढावा बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या वेळी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी जिल्हाध्यक्ष उदय बापू वाघ, करण पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा, तालुकाध्यक्ष अतुल मोरे, जिल्हा सरचिटणीस सदाशिव आबा पाटील, कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
‘क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्राच्या आराखड्याला मंजुरी’ जळगाव : ‘धरणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृतिकेंद्रासाठी तयार केलेल्या १५ कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचविण्यात यावी. सुशिक्षित आणि सक्षम युवापिढी घडविण्यासाठी क्रांतिकारी आणि

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language